शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर-शिराळ्यात उमेदवारांची चाचपणी : विधानसभा निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 23:57 IST

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये उमेदवारीवरून खलबते सुरू आहेत. युती झाल्यास इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेला सोडावा लागणार आहे, तर शिराळा मतदारसंघात भाजपचेच आमदार

ठळक मुद्देभाजप, शिवसेना युतीचे राजकारण पेटणारकाँग्रेसचे सत्यजित देशमुख यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केल्याने येथे मोठी चुरस

अशोक पाटील ।इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये उमेदवारीवरून खलबते सुरू आहेत. युती झाल्यास इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेला सोडावा लागणार आहे, तर शिराळा मतदारसंघात भाजपचेच आमदार असल्याने, ही जागा भाजपलाच मिळणार आहे. परंतु दोन्ही मतदारसंघात दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

इस्लामपूर मतदारसंघात यापूर्वी अशोकदादा पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी, विक्रम पाटील, विजय कुंभार यांनी भाजपचे अस्तित्व कायम ठेवले होते. युती शासनाच्या काळात अण्णासाहेब डांगे यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद होते. तरीही त्यावेळी भाजपला अच्छे दिन आले नव्हते. आता शेतकऱ्यांचे नेते सदाभाऊ खोत यांना कृषी राज्यमंत्रिपद मिळाले असून, त्यांच्या ताकदीचा अंदाज लावला जात आहे. राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात भाजपने फिल्डिंग लावली आहे. खोत यांच्यारूपाने भाजपला ताकद मिळाली आहे.

परंतु त्यांनी अद्यापही भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केलेला नाही. येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि आष्ट्याचे वैभव शिंदे या राष्ट्रवादीतून आयात केलेल्या नेत्यांवर भिस्त ठेवावी लागत आहे. मात्र केवळ त्यांच्या ताकदीवर राष्ट्रवादीला टक्कर देणे सोपे नाही. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी इस्लामपूर पालिकेत स्वत:च्या ताकदीवर पाच उमेदवार निवडून आणले आहेत. त्यामुळे येथील उमेदवारी शिवसेनेला मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. राष्टवादी वगळता इतर पक्षांशी जवळीक असलेल्या राहुल महाडिक यांनीही निवडणुकीसाठी मतदारसंघातील संपर्क वाढवला आहे.

शिराळा मतदारसंघात शिवाजीराव नाईक भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला जाणार असल्याचे निश्चित आहे. मात्र येथे महाडिक युवा शक्तीचे सम्राट महाडिक यांनीही दावा केला आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केल्याने येथे मोठी चुरस आहे. 

आगामी विधानसभेला शिवसेना व भाजपची युती झाल्यास शिराळा, सांगली, मिरज, जत हे चार मतदारसंघ भाजपसाठी राखीव आहेत, तर शिवसेनेसाठी इस्लामपूर, खानापूर, जत, कडेगाव हे मतदारसंघ राखीव आहेत. त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेलाच मिळणार आहे. आघाडी न झाल्यास सर्वच मतदारसंघात शिवसेना उमेदवार देणार आहे.- आनंदराव पवार,जिल्हाप्रमुख, शिवसेना.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगलीSadabhau Khotसदाभाउ खोत